
देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे देऊळवाडी येथील पंकज जगन्नाथ पवार (६७) हे राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
ही घटना गुरुवारी दुपारी १.१५ वा. च्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पंकज पवार हे गुरुवारी दुपारी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत होते. ही घटना त्यांचा सख्खा भाऊ विश्वनाथ जगन्नाथ पवार (६१) यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पंकज पवार यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंकज पवार यांना मृत घोषित केले. या घटनेची फिर्याद विश्वनाथ पवार यांनी देवगड पालीस स्थानकात दाखल केली. या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे.घटनेचा तपास देवगड पोलीस करीत आहेत.