दक्षिण कोकणचे पंढरपूर | सोनुर्ली श्री देवी माऊली जत्रोत्सव ९ रोजी

'लोटांगणाची जत्रा' म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेले देवस्थान !
Edited by: विनायक गांवस
Published on: October 22, 2022 12:14 PM
views 348  views

सावंतवाडी : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणुन प्रसिध्द असणारे आराध्य दैवत म्हणून जगभरात नावलौकीक असलेल्या लोटांगण करता आणि नवस व मनोकामना पुर्ण होणे  यासाठी प्रसिद्ध असलेली सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊली जत्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी 9 नोव्हेबर2022 रोजी सपन्न होत आहे. यावर्षी हा जत्रोत्सव ९ नोव्हेंबरला होत आहे. या जत्रोत्सवात लाखो भाविक या जत्रेला गर्दी करतात तसेच हजारो भाविक लोटांगण घालत नवस फेडतात. 

श्री देवी माऊली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. जिल्ह्यातील मोठ्या जत्रांना सोनुर्लीच्या जत्रेपासून प्रारंभ होतो. या जत्रोत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तसेच इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी येत असतात. या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनूर्ली माऊली देवस्थानं कमिटी पदाधिकरी यांनी केले आहे.