LIVE UPDATES

कारिवडे शाळेत चिमुकल्यांच्या दिंडीने अवतरलं प्रति पंढरपूर

Edited by: विनायक गावंस
Published on: July 08, 2025 17:22 PM
views 41  views

सावंतवाडी : कारिवडे शाळा नं. १ येथे आषाढी एकादशी निमित्त पारंपारिक वेशभूषेसहीत संगीताच्या तालावर पालखी सजवून हातात दिंडी, टाळ, मृदंग व डोक्यावर तुलशी वृंदावन घेऊन, विठ्ठल रखुमाई नाम गजरामध्ये व सर्व संत जनांच्या साथीने काढलेल्या वारकरी दिंडीतून प्रत्यक्ष पंढरपूर अवतरले.

     

पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी एकादशी ही हिंदू धर्मातील पवित्र तिथी आहे. या आषाढी एकादशीला पंढरपूर  येथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. या दिवशी ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ यांच्या पालख्या चंद्रभागेच्या काठी येतात. त्याप्रमाणे कारिवडे शाळा नं. ५ मधील चिमूरड्यांनी प्रत्यक्ष  विठ्ठल रखुमाई व सर्व संतजनांच्या साथीने ग्रामदैवत "कालिका देवी" मंदिरात आपल्या कलागुणांनी ग्रामस्थांसमोर  विविध कलाकृती सादर करून प्रत्यक्ष पंढरपूर येथील दिंडीचा सोहळा उभा  करून ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा दिंडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, शा. व्य. समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, अंगणवाडी ताई, स्वयंपाकी पालक यांचे सहकार्य लाभले.