LIVE UPDATES

पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी यांना पितृशोक

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 23, 2026 21:19 PM
views 47  views

सावंतवाडी : दाणोली बाजार येथील रहिवासी प्रभाकर उर्फ बाबुली सदाशिव सुकी (94) यांचे गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी सकाळी 10 वाजता दाणोली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगे, नातवंडे, जावई, सूना ,बहिणी असा परिवार आहे. पंचायत समितीचे सदस्य प्रशांत सुकी, शिरोडा येथील कनिष्ठ विद्यालयाचे निवृत्त मुख्याधापक उमेश सुकी, सावंतवाडी एस टी डेपोचे निवृत्त वाहक सुदेश सुकी यांचे ते वडील होत.