
बांदा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी शाखेच्यावतीने विविध सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक भा. वा. शिंपी गुरुजी आणि जॉन डी. रॉड्रिक्स गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आले.
या दिवशी तालुक्यातील दुर्गम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरोस धनगरवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व चौकुळ केंद्रातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा उपक्रमाचा सर्वात समाधानकारक भाग ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी शिक्षक नेते नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर तसेच निवृत्त केंद्रप्रमुख लवू चव्हाण यांनी समितीचा इतिहास, संघर्षाची परंपरा, संघटनेची ध्येय-धोरणे आणि शिक्षकांची संघटनात्मक बांधिलकी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष गोविंद शेर्लेकर, राज्य संघटक प्रशांत मडगावकर, तालुका शिक्षक नेते समीर जाधव, तसेच हेमंत सावंत, दीपक जाधव, विनोद झेंडे, प्रकाश शिंदे, उत्तम पाटील आणि विशाल प्रशालेचे मुख्याध्यापक विशाल मोहिते यांच्यासह अनेक शिक्षक शिलेदार उपस्थित होते.
चौकुळ केंद्रात जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जावेद तांबोळी व सहकारी शिक्षक अमोल कोळी, सत्यजित वेतुरलेकर, शितल गावडे, गणपती पाटील, गोविंद पाटील, किरण माने, मृणाल देसाई, वसुंधरा सुर्वे, अतुल कोळी, डॉ. चंद्रकांत सावंत, राहुल वाघदरे, सचिन कोकितकर, एकनाथ सुतार, अश्विनी देसाई,काशिनाथ हसबे, विद्याधर पाटील, सुरेश पाटील, गजानन सोमवंशी, स्वप्निल चौगुले आणि राजेंद्र नाईक यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पाडला. शिक्षकांच्या हक्कांसाठी संघर्ष करतानाच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सेवाभावाने कार्य करणे हीच समितीची खरी ओळख आहे असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.










