
देवगड : शिवस्वराज्य दिनानिमित्ताने पं. स. देवगड येथे शिवशक राजदंड स्वराज्य गुडी विधीवत उभारण्यात येऊन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या हस्ते विधिवत पुजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी यावेळी राज्य गीत विषय तज्ञ शिक्षक नारायण चव्हाण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथा वर पोवाडा श्रेया श्रीकांत अनभवणे हिने सादर केला. यावेळी उत्कृष्ट पोवाडा सादर केल्याबद्दल श्रेया श्रीकांत अनभवणे हिचा गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे तसेच सर्व खाते प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी मानले.