पंचायत समिती देवगड इथंपाणी गुणवत्ता प्रशिक्षण संपन्न

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 21, 2023 20:42 PM
views 82  views

देवगड : शुद्ध व सुरक्षित पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत कडून करण्यात येणारी कार्यवाही अधिक परीणामकारक निर्दोष व नियोजनद्ध व्हावी व जनतेला शुद्ध सुरक्षित पाणी पुरवठा व्हावा यासाठी असे प्रशिक्षण आयोजन करण्यात येते असते.असे प्रतिपादन उपविभागीय समन्वयक पाणी गुणवत्ता देवगड च्या हर्षदा बोथीकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले .

         या प्रशिक्षणात शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामपंचायती मधील जलसुरक्षक उपस्थित होते.यावेळी पाणी शुद्धीकरण बाबत घ्यावयाची काळजी,टी.सी.एल पावडर साठवण व निगा,जलसुरक्षक जबाबदाऱ्या व कर्तव्ये,प्रयोगशाळेत जैविक तपासणी व रासायनिक तपासणीसाठी करावयाची wQmis वर ऑनलाईन एन्ट्री बाबत मार्गदर्शन तसेच  गावस्तरावर शुद्धीकरणासाठी उपलब्ध असलेले अणुजैविक फिल्ड टेस्ट किट्स व रासायनिक पाणी नमुने तपासणीसाठी मल्टी पॅरामीटर किट बाबत मार्गदर्शन उपविभागीय समन्वयक पाणी गुणवत्ता देवगड हर्षदा बोथीकर यांनी केल.