पाळणेकोंड धरणाचा साडेपाच लाखांचा पाईप चोरीला !

बबन साळगावकरांनी वेधलं सावंतवाडी पोलीस निरीक्षकांचं लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: February 25, 2024 07:35 AM
views 76  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या पाळणेकोंड धरण येथील पाईपलाईनचे काम सुरू आहे. येथील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे पाईप चोरीस गेले असून तपास काम शून्य आहे. सुमारे दोन महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने सावंतवाडी पोलीस ठाण्यात याची नोंद केली.

34 पाईप 200 किलो वजनाचे आहे. याची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपयांच्या घरात जाते. याबाबत एफ आय आर दाखल करू नही पोलीस तपास योग्य दिशेने होत नाही. सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ यांनी तपास कामाला गती द्यावी व चोरांपर्यंत पोहचावे असं आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे.