अनिल भिसे मित्रमंडळातर्फे चित्रकला स्पर्धा !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2024 09:46 AM
views 104  views

सावंतवाडी : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनिल भिसे मित्रमंडळातर्फे क्रिडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे सर यांच्या स्मृतीदिना निमित्त इयत्ता 1 ली  व 2 री च्या लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा जगन्नाथ भोसले उद्यान सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. 

 स्पर्धेला येताना मुलांनी पॅड घेऊन येणे आवश्यक आहे. चित्रकलेसाठी लागणारा पेपर व रंग आयोजकांकडुन देण्यात येणार आहे. तरी मुलांनी संध्याकाळी ठिक 4.00 वाजता जगन्नाथ भोसले उद्यान, सावंतवाडी येथे उपस्थित रहावे. स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र व पहिल्या तीन क्रमांकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत.ज्यांना कोणाला या स्पर्धेत सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी श्री.संतोष परब, मोबा नं. 9146704663 यांचेशी संपर्क करावयाचा आहे.

याकरिता जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अभिमन्यू लोंढे, अनंत जाधव, डॉ. नरेंद्र लेले, रत्नाकर माळी, जतिन भिसे, हेमंत केसरकर, राजेश मोंडकर, अँथोनी फर्नांडिस बाळा हरमलकर, संजय म्हापसेकर, ब्रँड डिसोजा दिपक गांवकर, अजय मडगांवकर, , बेंजामिन फर्नांडिस, प्रविण बांदेकर, संतोष सावंत, प्रविण मांजरेकर, अरुण भिसे, नारायण गांवकर, प्रशांत वाळके, कुंदन टोपले  यांनी केले आहे.