
देवगड : देवगड येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून त्यानिमित्त १५ ऑगस्ट २०२४ ला शेठ म. ग. हायस्कूल देवगड येथे रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड च्या वतीने चित्रकला स्पर्धांच आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेतील जास्तित जास्त मुलांनी आपला सहभाग घ्यावा असेरोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड कडून आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील विषय पुढीलप्रमाणे आहे
१. पहिली ते चौथी विषय – कौलारू घर आणि नारळाची बाग वस्तुरूपी ३ बक्षिसे
पाचवी ते सातवी विषय – पावसाळ्यातील भातलावणी
बक्षिसे – प्रथम ७००/-द्वितीय ५००/- तृतीय ३००/-
आठवी ते दहावी विषय – कोकणातील गणेशोत्सव
बक्षिसे – प्रथम १०००/- द्वितीय ७००/-,तृतीय ५००/-
खुला गट विषय – कोकणी लोककला
बक्षिसे – प्रथम १५००/- द्वितीय १०००/- तृतीय ७००/-
स्पर्धेची वेळ:* सकाळी १०.३० ते १२.३० अशी ठेवण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी मनस्वी घारे – मोबा. ९४०३५६११७२ दयानंद पाटील – मोबा. ९४०५९२८०८० अनिल गांधी – मोबा. ९४२२३७३२५८ यांचेशी संपर्क साधावा.