स्मार्ट ग्राम स्पर्धेत पडेलचा तालुक्यात प्रथम क्रमांक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 13, 2024 13:18 PM
views 158  views

देवगड : देवगड पडेल गाव स्मार्ट ग्राम तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. पडेल गावाने स्मार्ट ग्राम होण्यासाठी अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत आहेत. पडेल सरपंच भुषण पोकळे यांनी गावाला अनेक पुरस्कार मिळावे यासाठी गावात लोकसहभाग मिळवत नाविन्यपुर्ण उपक्रम राबवत आहेत त्याचाच भाग म्हणून या गावाने स्मार्ट ग्राम स्पधेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे. नुकतेच पंचायत समिती कुडाळ अधिकारी वर्गाने  या गावाची तपासणी करत प्रथम क्रमांकाची घोषणा केली आहे .

      या यशात गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप, विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) अंकुश जंगले यांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच पडेल गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, माजी सरपंच उपसरपंच व सदस्य , लोकप्रतिनिधी, कर्मचारी वृंद, ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने यश प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया पडेल सरपंच भुषण पोकळे यांनी व्यक्त केले.