पी. एम. किसानचा लाभ बांग्लादेशी नागरिकांना मिळाल्याने शिवसेना आक्रमक...!

Edited by:
Published on: June 27, 2023 16:58 PM
views 271  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील काही गावांमधून शेकडो बांग्लादेशी नागरिकांनी पी. एम. किसान योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला असून प्रशासनाने त्यांचे अर्ज वैध ठरवून सात हप्ते त्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारा विरोधात व संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून आंदोलन छेडण्यात आले. शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.