
दोडामार्ग : परम पूज्य श्री सद्गुरु समर्थ राऊळ महाराज स्मारक मंदिर, साटेली-भेडशी (दोडामार्ग) येथे यंदाचा ०९ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार, दि. ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विविध मालिका आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्याला उपस्थित राहून सद्गुरूंच्या आशीर्वादाचा आणि अखंड महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. विठोबा विनायक (अण्णा) राऊळ, कार्याध्यक्ष, सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी व समस्त विश्वस्त मंडळ यांनी सर्व भाविक भक्तांना केले आहे.
वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
सोमवार, ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता काकड आरतीने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत श्री. प. पू. स. स. राऊळ महाराज चरणी अभिषेक होईल, तर ९ ते १० वाजे दरम्यान पाद्यपूजा व सार्वजनिक गाऱ्हाणे होणार आहे. दिवसभर विविध भजन मंडळांचे सुश्राव्य भजन सुरू राहील. यामध्ये भवानी सातेरी धारेश्वर महिला भजन मंडळ-घोटगे (सकाळी १० ते ११), सातेरी महिला भजन मंडळ खानयाळे (सकाळी ११ ते १२) आणि सातेरी केळबाई महिला भजन मंडळ दोडामार्ग (दुपारी १२.३० ते १) यांचा सहभाग असेल. दुपारी १ वाजता श्रींची महाआरती होणार आहे, त्यानंतर दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत अखंड महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येईल. दुपारी २.३० ते ४ वाजेपर्यंत श्री हनुमान दामोदर प्रासादिक भजन मंडळ भेडशी यांचे सुश्राव्य भजन, तर सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत घारपी ग्रुपच्या लहान मुलांची फुगडी सादर होईल. सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत श्री. भाऊ नाईक यांचे सुश्राव्य कीर्तन आणि ७ ते ८ वाजेदरम्यान श्री सातेरी लोककला मंच महिला ग्रुप तळेखोल यांचे समई नृत्य आयोजित करण्यात आले आहे. रात्री ८ ते १० वाजेपर्यंत सांजआरती आणि श्री. प. पू. राऊळ महाराजांच्या पादुकांचा पालखी मिरवणूक सोहळा (ढोलपथकाच्या ढोलवाद्याच्या गजरात) संपन्न होईल.
कार्यक्रमाची सांगता रात्री १० वाजता माजी विद्यार्थी संघ - कुडासे यांचा ऐतिहासिक नाट्यप्रयोग गरुडझेप (आग्र्याहून सुटका) या नाट्य प्रयोगाने होईल.
या संपूर्ण सोहळ्यासाठी राजन म्हापसेकर आणि अशोक विश्वनाथ कदम यांचे सौजन्य लाभले आहे. सदर कार्यक्रमात बदल करण्याचे अधिकार विश्वस्त मंडळास राहील, असेही कळविण्यात आले आहे.तरी सर्व भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विठोबा विनायक (अण्णा )राऊळ कार्याध्यक्ष सदगुरु राऊळ महाराज सस्थांन, पिंगुळी व समस्त विश्वस्त मंडळ, यांनी केले आहे










