
कणकवली : ओझरम सेवा मंडळ, मुंबई या संस्थेचा शैक्षणिक कामगिरीबद्दल गोपुरी आश्रमातर्फे विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, भाषातज्ज्ञ डॉ. प्रकाश परब, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, रानमाणूस प्रसाद गावडे, संचालिका अर्पिता मुंबरकर, अॅड. संदीप निंबाळकर, ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर, गोपुरी सदस्य विनायक सापळे, संदीप सावंत आदी उपस्थित होते.
ओझरम सेवा मंडळ, मुंबई या संस्थेने ओझरम पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करून देताना या वसतिगृहाचे व्यवस्थापन योग्य होण्यासाठी ग्रामस्थांच्या दक्षता समितीची स्थापना, विद्यार्थ्यांसाठी ई- लर्निंगची सुविधा, शाळेत नेहमीच स्वच्छता रहावी यासाठी उपाययोजना केल्या आहेत. संस्थेच्या या कामगिरीबद्दल गोपुरी आश्रमाच्यावतीने एका विशेष कार्यक्रमात ओझरम सेवा मंडळाचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्माम करण्यात आला.










