LIVE UPDATES

बांदानगरीत महाआरोग्य शिबीरास उदंड प्रतिसाद

शेकडो रुग्णांनी घेतला लाभ ; भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते शुभारंभ
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 12, 2026 12:02 PM
views 42  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : 'पोस्टर ऐवजी, आरोग्य सेवा' हा संदेश घेऊन बांदा येथे मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते श्यामकांत काणेकर व भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून भाजप सिंधुदुर्ग व कोकण संस्था मुंबई यांच्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शेकडोंच्या संख्येने रुग्णांनी सहभागी होत लाभ घेतला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त  सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 'मोफत महाआरोग्य शिबिरा'चे आयोजन करण्यात आलेय. दुसऱ्या दिवशी बांदा जिल्हा परिषदेत याचे आयोजन करण्यात आले होते. 

ज्येष्ठ भाजप नेते श्यामकांत काणेकर व भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या शिबिरास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, बांदा सरपंच प्रियांका नाईक, रुपाली शिरसाठ, उन्नती धुरी, मधुकर देसाई, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई, श्यामकांत काणेकर, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल, शहराध्यक्ष विकी कदम, जावेद खतिब, राजाराम सावंत, शितल राऊळ, प्रसाद पावसकर, नितीन सावंत, निलेश नाटेकर, बाबा काणेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरासाठी रुबी हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, अथायु हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल आणि डॉ.डी.वाय. पाटील हाॅस्पिटल यांचे सहकार्य लाभले. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा आणि मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

समाजसेवेतून वाढदिवस साजरा करण्याचा विशाल परब यांचा संकल्प या महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून साकार होत असून यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी तर आभार प्रियांका नाईक यांनी मानले.