वैभववाडी : विनापरवाना व ओव्हरलोड वाळू, खडी व चिरे वाहतूकीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आचिर्णे येथील गिरीधर रावराणे यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे. तालुक्यात अवैधपणे वाळू,चिरे ,खडी यांची होत आहे.विनापरवाना या गौण खनिजांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू आहे.काही वाहनांतून परवान्यापेक्षा अधिक मालाची वाहतूक केली जात आहे.यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे.
त्यामुळे संबंधित दोषी वाहतूकदार व सर्व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री रावराणे यांनी केली.याबाबतची तक्रार त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे दिली आहे.महसुल विभागाकडून आता काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे.