नियंत्रण सुटलं, क्रेटाची झाडाला धडक ; महिलेसह मुलगा जखमी

Edited by: विनायक गावस
Published on: June 28, 2023 17:40 PM
views 149  views

सावंतवाडी : सावंतवाडी : मुंबईहून गोव्याला जात असताना चालकाच कारवरील नियंत्रण सुटून इन्सुली येथील सातजांभळीला क्रेटानं धडक दिली. या अपघातात एक महिला व तिचा मुलगा जखमी झाला.

जखमींना इन्सुली येथील रिक्षाचालक अनिल नार्वेकर, माजी जि. प शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते हेमंत वागळे यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. परंतु, रूग्णालयात उपचारासाठी डॉक्टरच उपलब्ध नव्हते. त्यामुळे एमएलसी होण्यासाठी रूग्णांना डॉक्टरची वाट पहावी लागणार होती‌. दुसरीकडे अपघातग्रस्तांना रक्तस्त्राव होत असल्यानं रूग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्राथमिक उपचारासाठी खाजगी रुग्णालय गाठलं. त्यानंतर रूग्णांना गोवा बांबोळी येथे नेल्याची माहिती समोर येत आहे.


दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत यांना संपर्क केला असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले डॉक्टर भक्ती सावंत त्याच ठिकाणी होते. डॉक्टर नाही ही चुकीची माहिती दिली गेली. अपघातग्रस्त रूग्ण खुशबू ठाकूर व आर्यन पारवे यांची एमएलसी केली गेलीय.