
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत पॅनेलच्या नवनिर्वाचित विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. सावंतवाडी वैश्य भवन येथे या सत्कार सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत यांनी आमच्या निवडून आलेल्या सरपंचांना धमक्या, आमिषे दाखवून फोडण्याचे प्रयत्न बंद करावेत. अन्यथा येणार्या खासदारकीच्या निवडणूकीत जनता तुम्हाला घरी बसवेल असा इशारा दिला. तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कमंत्री नियुक्त केले जाणार असून सिंधुदुर्गची जबाबदारी मला मिळेल अशी अपेक्षा आहे.
तर राज्यात पुन्हा एकदा शिंदे- फडणवीसांच सरकार आणायचं आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर भांडत न बसता, कामाला लागा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच विकासाच व्हिजन घेऊन आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मी कधीही उतरत नाही. गावात मैत्रीपूर्ण लढती होत असल्यानं त्याठिकाणी राजकारण आणू नये या मताचा मी आहे. परंतु, नवनिर्वाचित सरपंचांना गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अस मत त्यांनी व्यक्त केली. यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.