
कणकवली : नांदगाव तिठा येथील सुरेश उर्फ बाळा मोरये व त्यांचा मुलगा कमलेश मोरये हा गेली काही वर्ष नागरिकांना विनाकारण त्रास देत आहे. काल ग्रामपंचायत मध्ये नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर यांच्या अंगावर जात त्या दोघांनीही धमकी दिली. काही दिवसापूर्वी मेडिकल दुकानदारांना मारहाण केली. गेल्या वर्षी रिक्षा चालकांना शिवीगाळ केली.बॅनर फाडले असे अनेक गुन्हे बाळा मोरये आणि कमलेश मोरये करीत आहेत. यामुळे नांदगाव ग्रामस्थांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे,संबंधितावर तातडीने पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांना नांदगाव सरपंच भाई मोरजकर,व्यापारी संघटना अध्यक्ष पंढरी वायंगणकर यांनी दिला आहे.
तसेच काल बाळा मोरये व त्यांच्या मुलाने अनाधिकृत बांधकाम केलेला सेडचा असेसमेंट देण्याची मागणी केली. त्यावेळी सरपंचांनी नकार दिला. त्यावेळी सरपंचांना धमकी देत अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. स्वतः विकलेल्या गाळ्या समोर चार दिवसापूर्वी दुकानासमोर किचनचे अनाधिकृत बांधकाम करत दादागिरी केली,असे सातत्याने दादागिरी करत नागरिकांना त्रास देण्याचा काम बाळा मोरये आणि त्यांचा मुलगा करत आहे. त्यामुळे संबंधित दोघांवर कठोर कारवाई करा अन्यथा नांदगाव ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार असा इशारा सरपंच भाई मोरजकर यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी महिला ग्रामपंचायत सदस्यांनी पुन्हा असा प्रकार घडल्यास जबाबदार कोण? अशी विचारणा पोलिसांना केली.
यावेळी माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री,रिक्षा संघटना जिल्हाध्यक्ष अण्णा कोदे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके, उपसरपंच इरफान साटविलकर, असलदे गावचे माजी सरपंच तथा व्यापारी संघटना अध्यक्ष पंढरी वायंगणकर ,उपाध्यक्ष मारुती मोरये, सचिव कमलाकर महाडिक, खजिनदार दाजी सदडेकर , माजी सरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अक्षता खोत,जैबा नावलेकर , विनोद मोरये, नमिता मोरये,यासिन नावलेकर, कमलेश पाटील,भुपेश मोरजकर, आनंद मोरजकर, श्रीराम मोरजकर, आनंद गगनग्रास, एकनाथ मोरये, निलेश मोरये,विजय मोरये,तोसीम नावलेकर,प्रविण मोरये आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.