भाजपचा जिल्हा परिषद गट स्थापन

जि. प. सदस्य संजय बोबडी गटनेते
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 06, 2026 15:06 PM
views 388  views

सिंधुदुर्गनगरी : नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संजय बोबडी यांना गटनेते करत भारतीय जनता पक्षाच्या २७ जिल्हा परिषद सदस्यांचा शुक्रवारी गट स्थापन करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा गट स्थापन करण्यात आला असून, या गटाचे गटनेते तसेच सर्व सदस्यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी अभिनंदन केले.