सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळी ३.३० वाजेपर्यंत ५०.१० टक्के मतदान

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 07, 2026 17:28 PM
views 11  views

सिंधुदुर्गनगरी : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ते दुपारी ३:३० या  कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ५०.१० टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात एकूण ५,६१,१०५ मतदारांपैकी दुपारी ३:३० वाजेपर्यंत २,४१,१४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १ लाख ४४ हजार ३५७ पुरुष आणि १ लाख ३६ हजार ७८४ महिला मतदारांचा समावेश आहे.

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे 

देवगड : ४९. ४५ टक्के

वैभववाडी : ४९. १७ टक्के

कणकवली : ५०. ७० टक्के

सावंतवाडी : ५५. ३८ टक्के

कुडाळ : ४७. ४५ टक्के

वेंगुर्ला : ५३. ०३ टक्के

दोडामार्ग : ४५. २४ टक्के

मालवण : ४७. ३० टक्के

आतापर्यंत सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर dodamarg तालुक्यात तुलनेने कमी मतदान झाल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यासाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. आतापर्यंत झालेल्या निवडणुकां पेक्षा या निवडणुकांमध्ये पैशाचा वापर कमी झाला आहे. यामुळे मतदारांमध्ये इरूत्साह असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असलेली स्थिती पाहता सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अजून दहा ते पंधरा टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. मात्र आतापर्यंत सुरू असलेल्या मतदानामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सगळीकडे मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत सुरू असल्याचे चित्र आहे.