दोडामार्गात ४ पर्यंत ४५..२५ % मतदान

Edited by: लवू परब
Published on: February 07, 2026 18:16 PM
views 7  views

दोडामार्ग : तीन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समिती नुवडणुकीचे आज सकाळपासून शांततेत मतदान पार पडले. मात्र, सायंकाळी ४ वाजे पर्यंत ४५.२४ % इतके सर्वात कमी मतदान दोडामार्ग तालुक्यात झाले आहे. लग्न समारंभ व गोव्यातील कामगारांना सुट्टी नसल्याने त्याचा परिणाम झाल्याचे मतदारांमधून बोलंले जात आहे.

शनिवारी सकाळी ७.३० वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली. सकाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत १० % मतदान झाले होते. तालुक्यातील 19182 पुरुषांन पैकी 8660 एवढ्यानी तर 19061 महिला मतदारांपैकी  8642 एवढ्याने सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान केले होते.