वैभववाडीत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद

५४.७९ टक्के मतदान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 07, 2026 19:18 PM
views 88  views

वैभववाडी : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ५४.७९ टक्के इतके मतदान झाले. या निवडणुकीत मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील एकुण ३१,९९१ पैकी १७,५२९ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये पुरुष ८५८९ व महीला ८९४० जणांचा समावेश आहे. मतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. मतपेट्या तहसील कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.