
सिंधुदुर्गनगरी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी ३० जानेवारी रोजी देशभरात हुतात्मा दिन पाळण्यात येतो. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, क्रीडा अधिकारी श्रीमती अडसूळ तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.










