
कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस हि आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केले.सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, रेन्बो रायडर्स सिंधुदुर्ग आयोजित इन्स्पायर सायकल 8 वे पर्व बॅ नाथ पै शिक्षण संस्था एम आय डी सी कुडाळ येथे आयोजित करण्यात आले याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी 60 किमी कोस्टल रेसमध्ये ठाणे मुंबई चा श्रीकांत खडतरे महाविजेता ठरला तर सांगलीची योगेश्वरी कदम महिलांमध्ये प्रथम, कोल्हापूर चा सिध्देश पाटील पुरूषांमध्ये प्रथम, वयोगट 40 वरच्या गटात गोव्याचा नवीन नाईक प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलपटूमध्ये मालवण कट्टा येथील श्राव्य झांटये प्रथम विजेता ठरला.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग श्री विजय काळे, उपविभागीय परिवहन इन्स्पेक्टर सुरजकुमार जाधव व माणिक चोरमोळे, कुडाळ तहसिलदार सचिन पाटील, दै तरूण भारत सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख शेखर सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उमेश गाळवणकर, लक्ष्मी ज्वेलर्स चे राजू पाटणकर, रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष राजीव पवार, लायन्स क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष आनंद कर्पे, राॅयल मालवणीचे डाॅ अभय परब, राणे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर कुडाळ डाॅ जी टी राणे व अजित राणे, डाॅ अमोघ चुबे,सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष गजानन कांदळगावकर,सचिव अमोल शिंदे, इव्हेंट चेअरमन प्रथमेश सावंत, रेन्बो रायडर्स चे डाॅ बापू परब, डाॅ सिध्दार्थ परब, शिवप्रसाद राणे, कुडाळ सायकल क्लब अध्यक्ष रूपेश तेली, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी २५ किमी फन राईड पूर्ण केली
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी इन्स्पायर सिंधुदुर्ग मध्ये सहभाग घेत 25 किमी ची फन राईड यशस्वी पूर्ण केली त्यांचा मेडल प्रमाणपत्र देवून विशेष सन्मान करण्यात आला.
विशेष सन्मान
अल्फा रेसिंग कोल्हापूर, नितीन खामामकर फोटोग्राफी ग्रुप पुणे, डाॅ प्रणव प्रभू, इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ अध्यक्षा सौ सानिका मदने, खजिनदार सौ गिंतांजली कांदळगावकर, सौ रश्मी नाईक, ॲड विवेक मांडकुलकर, सौ वेदिका मांडकुलकर, मिडिया पार्टनर महेश दाभोलकर( मुंबई),किंग ऑफ कुंभार्ली रत्नागिरी प्रमुख आयोजक विक्रांत आलेकर ,शिवप्रसाद राणे, सखे सोबती ग्रुप पिंगुळी, मुंबई ची 12 वर्षीय सायकलपटू सान्वी पाटील, लोहपुरुष प्रमोद भोगटे, अजित कानशिडे, बॅ नाथ पै चे कानडे सर, पडतेकाका, वेद साऊंड चे अभिजित परब, मुंबई च्या ज्येष्ठ महिला सायकलपटू रोहिणी तिलक व मंगला पै, निवेदक सचिन मदने आदींचा विशेष सन्मान करण्यात आला.
कोस्टल रोडरेसचा निकाल
60 किमी रेसमध्ये ठाणे मुंबई चा श्रीकांत खडतरे महाविजेता ठरला त्याला रोख रू 25 हजार, प्रमाणपत्र, मेडल देवून सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग गट*- प्रथम श्राव्य झांटये (मालवण),द्वितीय सिल्वेस्टर डिसोझा (सावंतवाडी),तृतीय डाॅ अब्दार पाटील( कणकवली), *40 वयोगट पुरूष गट*-- प्रथम नवीन नाईक (गोवा),द्वितीय किरण पवार( मुंबई),तृतीय रोहन कोळी( मुंबई), *महिला गट*-- प्रथम योगेश्वरी कदम (सांगली),द्वितीय श्रावणी घोडेश्वर (कोल्हापूर), तृतीय सृष्टी कुंभोजे (कोल्हापूर), *वयोगट 14 ते 40*-- प्रथम सिध्देश पाटील (कोल्हापूर),द्वितीय हनुमंत चोपडे (सांगली),तृतीय ओंकार खेडकर( पुणे), या सर्व प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रत्येकी 15 हजार, 10हजार,7हजार रोख रक्कम, मेडल, प्रमाणपत्र देण्यात आले.
मतदार दिन व रस्ता सुरक्षा दिन साजरा
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग विजय काळे, तहसिलदार सचिन पाटील, कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिन व रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. मुळदे कृषिमहाविदयालय व संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील राष्ट्रीय छात्र सेना विद्याथ्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पत्रकार प्रमोद ठाकूर यांनी 25 किमी फन राईड पूर्ण केली त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक गजानन कांदळगावकर, सूत्रसंचालन सचिन मदने, आभार अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.










