
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार १७ आणि रविवार १८ जानेवारी रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारांना आवश्यक असलेले दस्तऐवज तत्काळ उपलब्ध व्हावेत, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी आदेश काढले आहे. १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. यावेळी इच्छुक उमेदवारांना ग्रामपंचायत मधून दस्तऐवज, दाखले, प्रमाणपत्र याची उपलब्धता होणे गरजेचे असते. त्यामुळे या काळातील शनिवार आणि रविवारची सुट्टी रद्द करण्यात येत असल्याचे खेबुडकर यांनी आदेशात म्हटले आहे. तसेच निवडणूक कालावधीत आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.










