देवगड महाविद्यालयाच्या युवा महोत्सवाची उद्यापासून सुरुवात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 15, 2026 20:33 PM
views 33  views

देवगड :  देवगड महाविद्यालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणारा देवगड युवा महोत्सव (DYF 2025–2026) येत्या दि. 16 व 17 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जात आहे. यंदाच्या युवा महोत्सवाची संकल्पना ही “Youth Power – Change Makers of Tomorrow”अशी असून, युवकांच्या शक्तीवर आणि उद्याच्या समाजघडणीतील त्यांच्या भूमिकेवर भर देण्यात आला आहे.या दोन दिवसीय महोत्सवात गायन,नृत्य, नाट्यप्रकार,स्किट, एकांकिका तसेच विविध सांस्कृतिक व कलात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या महोत्सवात सहभागी होत असून, महाविद्यालय परिसरात सध्या तयारीची लगबग सुरू आहे.

देवगड महाविद्यालयाच्या वतीने या युवा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभाग कार्यरत असून, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभत आहे. युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि सांस्कृतिक जडणघडणीसाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार असल्याचे मत महाविद्यालय प्रशासनाने व्यक्त केले आहे.