
देवगड : देवगड शहरात २८ जानेवारी २०२१ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या काढण्यात आलेल्या भाजप जन आशिर्वाद यात्रा या रॅलीदरम्यान जमाव करुन, घोषणा देवून, दगडफेक करुन अडथळा आणल्या प्रकरणी कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह १० जणांची देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. पचंडी यांनी सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी देवगड येथील ॲड.कौस्तुभ मराठे व ॲड. सिध्देश माणगांवकर यांनी बचाव पक्षातर्फे काम पाहिले.
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये भारतीय जनता पक्षाने जन आशिर्वाद यात्रा या नावाने ठिकठिकाणी रॅली आयोजित केल्या होत्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशिर्वाद यात्रा दुपारी १.०० वाजताचे सुमारास देवगड येथील शिवसेना पक्षाचे कार्यालया समोरुन जात असताना १) संदेश पारकर २) रविंद्र जोगल ३) निवृत्ती तारी ४) संतोष तारी ५) तुषार पेडणेकर ६) मिलिंद साटम ७) अमोल लोके ८) शरद लोके ९) सौरभ माने १०) लक्ष्मण तारी यांनी बेकायदेशीरपणे जमाव करुन, दगडफेक करुन, घोषणाबाजी करुन सदर रॅलीमध्ये अडथळा आणला होता. या प्रकरणी देवगड पोलीसांनी संशयित आरोपींवर भा.दं.वि. कलम १४३, १४९, १८८, २६९, २७० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.दरम्यान न्यायालयीन सुनावणीदरम्यान या गुन्हयातील साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती व इतर बाबींच्या आधारे मा.देवगड न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.










