पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 09, 2026 17:38 PM
views 189  views

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक १० जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता पालकमंत्री चषक 2026: तालुकास्तरीय भजन स्पर्धेच्या उद्घाटनास उपस्थित ( स्थळ:- भगवती मंगल कार्यालय, ता.कणकवली). सकाळी 11 वाजता मालवण तालुक्यातील मौजे मसुरे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी वार्षिक जत्रौत्सव 2026, आढावा बैठक (स्थळ:-जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). सकाळी 11.30 वाजता देवगड तालुक्यातील मौजे कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रौत्सव 2026, आढावा बैठक (स्थळ:-जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 12 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शिवसृष्टी व पर्यटन पूरक सुविधा निर्माण करणे य विषयाबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक ( स्थळ:-जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग). दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान सन 2025-26 अंतर्गत जिल्हा परिषदेकडील विविध कामांचे भूमीपुजन व उद्घाटन तसेच वैयक्तिक लाभ वितरण देणे व सन्मान सोहळ्यास उपस्थिती ( स्थळ:- इच्छापुर्ती मंगल कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी). दुपारी 1 वाजता मोटारीने मोपा, गोव्याकडे प्रयाण.