वारकरी परंपरेचा जागर..!

विजय सिंग तावडे यांना ज्येष्ठ वारकरी पुरस्कार | वारकरी दिनदर्शिकेचं प्रकाशन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 26, 2025 18:51 PM
views 7  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार,गेली ४५ वर्ष वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील विजयसिंग बळीराम तावडे यांना प्रदान करण्यात आला. ओरोस येथील रवळनाथ मंदिर येथे आयोजित वारकरी मेळाव्यात हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष  ह.भ. प. विश्वनाथ गवंडळकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

अध्यक्ष श्री देव रवळनाथ देवस्थान व उत्सव समिती उपाध्यक्ष रमाकांत बापू परब, सरपंच ओरोस बु। सौ. मुरमुरे मॅडम,तंटामुक्ती अध्यक्ष व उत्सव समिती खजिनदार सुहास मालोजी परब, उत्सव समिती अध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री, उत्सव समिती सचिव मदन नामदेव परब, सरपंच कसाल राजन परब. वारकरी मंडळ ओरोस अध्यक्ष श्री. प्रभाकर लक्ष्मण सावंत. आदीसह सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, कार्याध्यक्ष संतोष राऊळ, सेक्रेटरी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर, उपाध्यक्ष राजू राणे, रामचंद्र कदम,आर.के.सावंत,जिल्हा कार्यकारणी सदस्य राजा पडवळ, विनायक मेस्त्री, तसेच रमाकांत परब, सुहास परब आधी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना,अध्यक्ष ह.भ. प. विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी वारीची परंपरा कायम राखण्यासाठी ज्या वारकऱ्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. ज्येष्ठ वारकरी पुरस्कार प्राप्त विजय सिंग बळीराम तावडे यांच्या कार्यातून नवी प्रेरणा समाजाला मिळाली वारकरी घडविण्यासाठी तावडे महाराज यांच्यासारखे काम करणाऱ्या वारकऱ्यांची समाजाला गरज असल्याचे ही गवंडळकर महाराज  म्हणाले.

यावेळी दिंडी श्री देव रवळनाथ मंदिराच्या सभोवताली दिंडी प्रदक्षिणा करण्यात आली.ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री, यांचे कीर्तन करण्यात आले. अपूर्व उत्साहात वारकरी सोहळा संपन्न झाला. दरम्यान वारकरी मेळाव्यानिमित्त 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा झाला. जिल्हा अधिकारी तुप्ती धोडमिसे तसेच डेपोटी जिल्हा अधिकारी यांनी भेट दिली. यावेळी धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. अनेक मान्यवरांनी या पारायणाला उपस्थिती दर्शवली होती.