
सिंधुदुर्गनगरी : सरपंच पद हे जनतेतून निवडून दिलं जातं त्याचप्रमाणे या पदाला जनता पुन्हा घरी पाठवू शकते याचे उदाहरण कुडाळ तालुक्यातील पडवे या गावात आज जनतेने दाखवून दिलं आहे. पडवे गावचे सरपंच आनंद शंकर दामोदर यांच्या वरील अविश्वास ठरावावर झालेल्या मतदानात 328 विरुद्ध 202 मतांनी मतदारांनी सरपंचांना घरी पाठवले आहे.
दरम्यान, या ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांच्यासहित सदस्यांनी केलेल्या या अविश्वास ठरवा विरोधात सरपंच श्री दामोदर हे न्यायालयात गेले असून, न्यायालयचा निर्णय त्यांना वाचावीणार याच्यावर लक्ष लागले आहेत.










