तळेबाजार प्रशालेमध्ये राष्ट्रीय पोषण महीना २०२२अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

Organizing various activities under National Nutrition Month 2022 in Talebazar School
Edited by: रुपेश पाटील
Published on: September 24, 2022 18:13 PM
views 187  views

देवगड : केंद्रशासनाने तसेच राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर - २०२२ अंतर्गत देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिर प्रशालेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. उपक्रमांमध्ये पारंपारिक आहाराचे सत्व व पोषकता मुलांना समजण्यासाठी 'आजीबाईचे स्वयंपाकगृह', गावातील सर्वांना पोषक आहाराचे महत्व समजण्यासाठी प्रभातफेरी, विविध पोषक डाळी, कडधान्यापासून व फळांपासून रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध फळभाज्यांची परसबागेतील लागवड वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच मुलींच्या विविध समस्यांचे उद्बोधन करण्यासाठी मार्गदर्शन वर्गाचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये संस्था, प्रशालेचे मुख्याधापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंदाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक आर. ए. घोगळे व सर्व सहकाऱ्यांचे देवगड  तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांनी व पंचक्रोशीतील सर्व पालकांनी कौतुक केले.