कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 16, 2023 12:27 PM
views 148  views

मालगुंड : मराठी साहित्यात अग्रगण्य असणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी अडीच वाजता कवी केशवसुत स्मारक मालगुंड ता. जि. रत्नागिरी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या सभेत सन २०२२ - २३ पर्यंतच्या झालेल्या खर्चाची माहिती देणे व मंजुरी घेणे, सन २०२३ - २४ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, सन २०२३ - २४ साठी सनदी लेखापाल यांच्या नियुक्तीला मंजुरी घेणे, कार्यकारिणीने मंजूर केलेल्या विश्वस्तांच्या नियुक्त्याना मान्यता देणे यासह सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा होणार आहे. या सभेसाठी काही सभासदांना ठराव वा सूचना पाठवायच्या असतील तर त्यांनी २० सप्टेंबर २०२३ पर्यंत केंद्रीय कार्यालयात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तरी या सभेला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सभासदांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.