शिवजयंतीनिमित्त भव्य आंतरराज्य स्पर्धांचे आयोजन !

मातृभूमी शिक्षण संस्थेचा 'शिवसंस्कार' उपक्रम
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 03, 2023 16:55 PM
views 330  views

सावंतवाडी ः मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडी, सिंधुदुर्गच्या वतीने 'शिवसंस्कार' या देशव्यापी उपक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी रोजी येणाऱ्या शिवजयंतीचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व इतिहासातील अजरामर व्यक्तिरेखा व आपला जाज्वल्य इतिहास मुलांना या स्पर्धांच्या माध्यमातून अभ्यासता यावा व त्यांच्या विविध क्षेत्रातील कलागुणांना आंतरराज्यीय स्तरावर प्रस्तुत करता यावे या उदात्त हेतूने सदर स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत.                             

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात ऑनलाइन स्पर्धाछत्रपती शिवाजी महाराज वेशभूषा स्पर्धा

पहिला गट- वय- ३ ते ५ वर्षे

दुसरा गट- ११ ते १४ वर्षे

तिसरा गट- १५ पासून पुढे

अटी- व्हिडिओ २ मिनिटांचा असावा. बॅकग्राऊंड म्युझिक कमी आवाजात, लाईट वापरू शकता. एका टेकमध्ये, एडिट न करता पाठवलेला व्हिडिओच फक्त ग्राह्य धरला जाईल. वेळेचा नियम न पाळल्यास व्हिडिओ स्पर्धेत घेतला जाणार नाही. स्पर्धकाने व्हिडिओ पाठवून स्वतःचा फोटो (त्यावर नाव एडिट करून) शिवसंस्कारला पाठवायचा आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आपले नाव, वय आणि गाव यांचा उल्लेख अनिवार्य आहे.

पोवाडा स्पर्धा विषय- फक्त शिवाजी महाराज

या स्पर्धेला कोणतीही वयोमर्यादा नाही. पोवाडा व्हिडीओ ४ ते ५ मिनिटांचा असावा. साथसंगत घेतलेली चालेल.

वक्तृत्व स्पर्धाः विषय-छत्रपती शिवाजी महाराज

पहिला गट- १० ते १४ वर्षे (इ. चौथी ते आठवी)

चित्रकला स्पर्धाः विषय १. छत्रपती शिवाजी महाराज

२. छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील कोणताही प्रसंग.

गट पहिला - ११ ते १५ वर्षे

गट दुसरा - १६ पासून पुढे

चित्र A3 साईझ च्या पेपरवर, फक्त वॉटर कलर मध्ये असावे. चित्र काढायला सुरुवात केल्यापासून पंधरा सेकंदांचे चार टप्प्यातले विडिओ एकत्र एडिट करून शिवसंस्कारला पाठवावेत. सदर चित्र मातृभूमी शिक्षण संस्था, डी २८८, सबनीसवाडा,सावंतवाडी, सिंधुदुर्ग ४१६५१० या पत्त्यावर पाठवावे.

प्रत्येक स्पर्धेसाठी प्रवेश फी ५० रु. फक्त एवढी आहे. ही फी संस्थेचा QR कोड स्कॅन करून भरावयाची आहे. त्यासाठी शिवसंस्कारच्या अधिकृत नंबरवर संपर्क साधावा.

संपर्क-9607827296, 9823537296,            9673932219,            7666867144    

दि. २३ जाने.रोजी असलेल्या शहाजीराजे पुण्यतिथी निमित्त फक्त खुल्या गटासाठी आंतरराज्यीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. वय १८ पासून पुढे.

विषय- स्वराज्य संकल्पक शहाजीराजे

अटी- शब्द मर्यादा- किमान २०००,

स्वहस्ताक्षरात पेपरच्या एकाच बाजूला निबंध लिहावा.

संस्थेच्या पत्त्यावर निबंध दि. १० फेब्रुवारीपर्यंत कुरिअर किंवा स्पीडपोस्टने पाठवावा. प्रवेश फी ५० रु.

वरील स्पर्धांमध्ये सहभागी सर्वांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रत्येक गटातून प्रथम ३ विजेत्यांना घरपोच प्रमाणपत्र मिळेल. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांक विजेत्याला शिवसंस्कारच्या वार्षिक भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल व आपली कला सादर करण्याची संधी मिळेल.

निबंध स्पर्धा विजेता निबंध शिवसंस्कारच्या स्मरणिकेत  प्रसिद्ध केला जाईल.

चारही राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन छ. शिवाजी महाराजांना मांवनदना देण्याचे आवाहन मातृभूमी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सोनल लेले व शिवसंस्कारचे कार्याध्यक्ष गणेश ठाकूर यांनी केले आहे.