
वेंगुर्ले : रेडी येथील श्री देव ब्राम्हण नवरात्रोत्सव रेडी म्हारतळेवाडी येथे सलग १२ व्या वर्षी विविध सांस्कृतिक, सामाजिक, स्पर्धा दांडिया, गरबा, फुगडी, भजन तसेच रक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आज गुरुवारी सरपंच श्री रामसिंग (भाई) राणे, माजी आरोग्य शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, मंगेश कामत रेडी उपसरपंच नमिता नागोळकर, तंटामुक्त अध्यक्ष गोपाळ राऊळ या सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आलं.
प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षीही आरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबीर, पाककला स्पर्धा तसेच शुभम धुरी यांचा संगीत खेळ पैठणीचा कार्यक्रम, लहान मुलांसाठी फॅन्सीड्रेस स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी नंदकुमार मांजरेकर - 9422381844 तसेच निलेश पांडजी यांच्याशी संपर्क करावा.