सावंत फाउंडेशनच्यावतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 03, 2023 18:31 PM
views 170  views

कणकवली : सावंत फौंडेशन  गेली 20 वर्षे सिंधुदुर्ग मध्ये शैक्षणिक, आरोग्यविषयक, सांस्कृतिक, सामजिक आणि शेतकी विषयावरील विविध उपक्रम राबवत आहोत. या वर्षी सावंत  फौंडेशन संचलित डॉ रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र आणि डॉ होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन (HBSCE) आणि टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च (TIFR)आणि इतर संस्था यांच्या सहकार्यातून तीन दिवसांचा  विज्ञान प्रात्यक्षिक प्रयोगांचे एकूण चार कार्यक्रम शिक्षकांसाठी कणकवली,वैभववाडी कुडाळ, आणि मालवण तालुक्यांन मध्ये मध्यमिक शाळांमध्ये आयोजित करण्यात येत आहे यापैकी पहिला कार्यक्रम कणकवली मधील विद्यामंदिर शाळेमध्ये ऑगस्ट महिन्यात 10,11,12 या तारखांना आयोजन करण्यात आले आहे 


'डॉ रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र' श्रीनगर (कळसुली), तालुका कणकवली केंद्राचे उदघाटन जानेवारी 2018 मध्ये डॉ परेश जोशी यांच्या हस्ते  पहिली तीन दिवशीय शिक्षक विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळा  घेऊन करण्यात आले होते. आणि त्यावेळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिक्षकांना विज्ञान शिकविण्या बद्धल मार्गदर्शन करण्यात आले होते. आता पर्यंत जिल्ह्यामध्ये  एकूण सहा आकाश दर्शन कार्यक्रम शिक्षक विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळा मार्गदशन  व प्रायमरी शिक्षक कार्यशाळा मिर्ती स्पर्धा , योगा प्रशिक्षण व स्मरण शक्ती वाढविण्यासाठी योगा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले कोव्हिडं काळातील व्यतय्या मुळे कायक्रमांन मध्ये बदल करून ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करून मुलांना मार्गदर्शन करण्यावर भर दिला प्रयोगातून विज्ञान मार्गदर्शक डॉ परेश जोशी  हे   2007 मध्ये इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड (IJSO) मध्ये सामील झाले आणि 2018 पर्यंत भारताचे नेतृत्व केले  2015 पासून 2022 पर्यंत ते आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहित होते. या कालावधीत त्यांच्या नेतृत्वा खाली कार्यसंघाने मोजमाप, संकल्पना स्पष्टता, विज्ञानाचे एकत्रीकरण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र), डेटा कसा गोळा करायचा, डेटा सादर करणे आणि त्या प्रयोगांमधून निष्कर्ष काढणे या संकल्पना हाताळणारे अनेक सोपे प्रयोग विकसित केले. कोणतीही अत्याधुनिक उपकरणा शिवाय आणि महागडी उपकरणे खरेदी करायची नाहीत हे त्यांनी मुख्य आग्रही धोरण बाळगले  आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने 2013 मध्ये IJSO चे आयोजन केले तेव्हा त्यांनी ब्युरेट्स आणि पिपेट्सची जागा साध्या सिरिंजनच्या वापराने केली.


विज्ञान प्रयोगांची ही संस्कृती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे.  विद्यार्थ्यांच्या विज्ञान संकल्पना अधिक दृढ करण्यासाठी प्रथम त्यांच्या शिक्षकांना अशा सोप्या विज्ञान प्रयोगांची ओळख करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना हे प्रयोग विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यात आत्मविश्वास वाटेल. शाळेत मोठ्या उत्साहाने शिकवल्या जाणाऱ्या सिद्धांताला पूरक होण्यासाठी हे प्रयोग अत्यंत आवश्यक आहेत.


सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील  मुलांचा दहावी बारावीचा लागणारा  आतापर्यंत चा यशस्वी निकाल आणि त्यासाठी शिक्षक घेत असलेली मेहनत आपण पाहतोच. खेड्यातील या मुलांच्या भवितव्यासाठी विज्ञान विषयावर विशेष मार्गदर्शन केल्यास अधिक प्रमाणात विध्यार्थ्यामध्ये विज्ञान विषयाची ओढ निर्माण होईल व त्यातून  आपल्या देशाला अधिकाधिक शास्त्रज्ञ, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, व इतरही विषयात या ज्ञानाच्या जोरावर यशस्वी सक्षम तज्ञ व्यक्ती मिळतील ही डॉ रमेश सावंत यांची संकल्पना त्यांना खूपच  योग्य वाटली. 


खेड्यात मिळणाऱ्या अपुऱ्या साहित्य व संसाधना मुळे मुलांची  बौद्धिक वाढ खुंटते. गावातील हुशार मेहनती विध्यार्थी व शिक्षक  याना सावंत फौंडेशनने  आयोजित केलेल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेमधून "प्रथम गुरू मग शिष्य" या धेय्यावर उत्कृष्ठ शिक्षक निर्मितीचा पहिला प्रयत्न त्यांनी 2018 मध्ये केला. या  कार्यशाळेत  मिळालेला प्रतिसाद व  मुलांनी अगदी सहज केलेल्या प्रयोगांच्या आकलना नंतर कोकणात अधिकाधिक कार्यशाळा घेण्याचे त्यांनी सुचवले होते पण मधील कोव्हीडचा लॉक डाउन मुळे शक्य  झाले नाही. पण आता या वर्षी ऑगस्ट 2023 ते जानेवारी 2024 या काळात "प्रयोगातून विज्ञान" या विषयावर चार कार्यशाळा कणकवली, कुडाळ, मालवण आणि वैभववाडी मध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. 


पहिली कार्यशाळा दिनांक 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट विद्यामंदिर हायस्कुल कणकवली मध्ये घेण्यात येत आहे. या कार्य शाळेचा फायदा संपूर्ण कणकवली तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांनी व विज्ञानाची आवड असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी घ्यावा ही आयोजकांनी व जोशी सरांची प्रामाणिक भूमिका आहे. या कार्यशाळेतून  शिक्षकांमध्ये अजून नवीन तज्ञ शिक्षक निर्माण करावेत  व  त्यांनी ज्ञानदान करून त्याचा फायदा जिल्ह्याचा मुलांचा शैक्षणिक दर्जा अजून अधिक उंचावून द्यावा हा आहे. आपल्या  देशाला या मातीतून जास्तीत जास्त शास्त्रज्ञ मिळवून द्यावेत हेच  त्यांचे व आमचे स्वप्न आहे. 


 ह्या सर्व कार्यशाळा सर्वासाठी मोफत आहेत तरी त्याचा लाभ सर्वानी घ्यावा. अधिक माहितीसाठी [email protected] वर आयोजकांना संपर्क साधावा.

 उत्कृष्ट समाज निर्मिती साठी ,कोकणातील मुलांच्या भवितव्यासाठी , शिक्षण क्षेत्रात गुरू आणि शिष्यांच्या मार्गदर्शनासाठी ,महागड्या उपकरनां विना साध्या सोप्या उपलब्ध वस्तूंचा वापर करून सोप्या भाषेत विज्ञान प्रयोग शिकविण्यासाठी आणि खेड्यातील मुलांना समजून घेण्यासाठी असल्याने यामध्ये बहुतांश शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सेक्रेटरी शरद सावंत यांनी केले आहे