ST कडून 'प्रवासी राजा दिन'चं आयोजन

तक्रारींचे होणार निवारण
Edited by:
Published on: July 11, 2024 09:43 AM
views 267  views

सिंधुदुर्ग : महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. १५ जुलै २०२४ पासून प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी 'प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या व राष्ट्रीय परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील.

हे कार्यक्रम सावंतवाडीला १५ जुलै, मालवण १९ जुलै, कणकवली २२ जुलै, देवगड २६ जुलै, विजयदुर्ग २९ जुलैला सकाळी १० ते १ या वेळेत होणार असल्याच विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी सांगितले.