हळबे महाविद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन

Edited by:
Published on: October 31, 2023 18:50 PM
views 192  views

दोडामार्ग :  पालकांचा पूर्वपार चालत आलेला आपल्या पाल्या विषयी दृष्टिकोन तो म्हणजे शिक्षकच मुलांना घडवितात परंतु शिक्षक हा विद्यार्थी जीवनाला वळण लावणारा एक भाग आहे. संपूर्ण वर्तुळ नव्हे तर ती एक नाण्याची बाजू आहे.विद्यार्थी पूर्ण होण्यास शिक्षक व पालक या नाण्याच्या दोन्ही बाजूंची गरज आहे. दोन्ही बाजूनी समान पोषक वातावरण मिळाल्यास विद्यार्थी नक्कीच उच्च स्तरावर जाऊन पोहोचतील .यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा पालकांपर्यंत पोहोचावा याच अनुषंगाने नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात  पालक शिक्षक संघ विभागामार्फत पालक मेळावा आयोजित करण्यात आला.   

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत ,पालक श्री. नितीन मणेरीकर ,श्री सुशांत मणेरीकर  ,पालक शिक्षक विभाग प्रमुख डॉ. संजय खडपकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. यावेळी पालक वर्गाकडून त्यांच्या मनातील शंका व महाविद्यालयाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या गेल्या तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी  यांनी महाविद्यालयाकडुन वेदांता कंपनी मार्फत फक्त शंभर रुपये प्रवेश फि ने महाविद्यालयात सगळ्या प्रकारचे कम्प्युटर कोर्स दिले जातात क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जातात तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात  तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम ,स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात . अशाप्रकारे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सुविधांची माहिती करून देत  महाविद्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या उपक्रम ,कार्यक्रम ,स्पर्धेत आपला पाल्य उपस्थित होतो का  हे  पालकांनी पहाणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन करत पालकांच्या मनातील शंकांचे निरसन केले. यावेळी डॉक्टर संजय खडपकर यांनी सूत्रसंचालन तर प्राध्यापिका प्रियांका गवस हिने आभार व्यक्त केले