
सावंतवाडी : नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ''ऑनलाइन रेकॉर्ड डान्स स्पर्धे''चे आयोजन करण्यात आले आहे.
मालवणी मातीतील प्रसिद्ध साहित्यिक गंगाधर महाम्बरे यांनी लिहिलेले "चम चम चम, पुनवेचा चांद आला गगनी रे "या गीताची ध्वनिमुद्रिका व व्हिडिओ नुकताच अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा, मालवण यांनी अनावरण केला आहे. या गीताला अमर पवार यांचे संगीत लाभले असून सौ. रश्मी आंगणे यांनी या गीताचे गायन केले आहे. हे गीत शाळाशाळांतील सर्व विद्यार्थ्याच्या व शिक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. अनेक पालक सुद्धा हे गाणं गुणगुणताना दिसत आहेत. अनेक शाळांनी या गीताचे उत्स्फूर्त स्वागत केले असून नाचून गाऊन त्याचे व्हिडिओ सुद्धा तयार केलेले आहेत. अनेक शाळांनी या गीताची ध्वनिमुद्रिका वाजवून शालेय वातावरण आनंददायी केले आहे. या उपक्रमाला कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. शाळाशाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांच्या मुखी असणाऱ्या या आनंददायी गीतावर ऑनलाईन रेकॉर्ड डान्स स्पर्धा घ्यावी असा मानस दीपकभाई केसरकर मित्र मंडळाच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपकभाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी व अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला तालुका मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ही ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे तरी या स्पर्धेमध्ये सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीही शाळा या स्पर्धेमध्ये स्वेच्छेने सहभागी होऊ शकते. बक्षीसे गुणानुक्रमे प्रथम तीन व उत्तेजनार्थ दोन संघांना प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक दिले जाईल. प्रथम क्रमांक 5005/-, 'द्वितीय क्रमांक 4004/ व तृतीय क्रमांक 3003/-, उतेजनार्थ एक-1001/-, उत्तेजनार्थ दोन 1001/- अशी असून रेकॉर्ड डान्स केलेल्या व्हिडिओची लिंक deepakkesarkarmitramandal@gmail.com या ई-मेल ला किंवा व्हिडिओ 9422040874 या टेलिग्राम क्रमांकावर पाठवण्याचा अंतिम दिनांक 24 जुलै 2024 वेळ रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत आहे. स्पर्धेस नियम व अटी लागू आहेत.