उंबर्डे येथे १८, १९ फेब्रुवारीला राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन

ग्रामसेवा क्रीडा मंडळ उंबर्डे यांचे आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 17, 2023 18:28 PM
views 187  views

वैभववाडी :  ग्रामसेवा क्रीडा मंडळ उंबर्डे यांच्यावतीने १८ व १९ फेब्रुवारीला राष्ट्रीय शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत निमंत्रित १६ संघाना सहभाग देण्यात आला आहे. राज्याबाहेरील सहा संघ खेळणार आहोत. राष्ट्रीय स्तरावर खेळणारे खेळाडु या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

उंबर्डे गावचे  ग्रामसेवा मंडळ गेल्या तेरा वर्षापासुन शुटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन करते.यावर्षी १८ व १९ फेब्रुवारीला या स्पर्धेचे आयोजन उंबर्डे ग्रामपंचायतनजीकच्या मैदानात करण्यात आले आहे.या स्पर्धेतील विजेत्या संघास ३५ हजार रूपये व चषक,द्वितीय क्रमाकांस ३० हजार रूपये व चषक,तृतीय क्रमांकास २० हजार रूपये व चषक,चतुर्थ क्रमांकास १५ हजार रूपये व चषक याशिवाय पाच ते आठ क्रमांकापर्यतच्या सर्व संघाना प्रत्येकी पाच हजार रूपये व चषक देण्यात येणार आहे.याशिवाय उत्कृष्ट नेटमन,उत्कृष्ट शुटर,उत्कृष्ट लिफ्टर,आदर्श संघ, यांना देखील आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय स्पर्धेत दिल्ली,राजस्थान,पंजाब,उत्तराखंड,उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश या सहा राज्यातील संघ सहभागी झाले आहेत.याशिवाय नाशिक,औरगांबाद,सांगली,पुणे,मुंबई,सातारा,सोलापुर,कोल्हापुर,रायगड,जळगाव हे संघ सहभागी झाले आहेत.या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडु मित्तल,सुरेन्द्र,युरविंदर सिंग,खली,शोएब,विनीत,अरूण कुमार शर्मा,सुनिल मैना,भागवत भास्कर,नितीन पाटील,नितीन काकडे,अय्याज शेख,जयंत खंडागळे,सिध्दार्थ लाहोर आदी खेळाडुचा खेळ पाहण्याची संधी जिल्ह्यातील शुटिंगबॉल क्रिडाप्रेमीनी मिळणार आहे.ही संपुर्ण स्पर्धा दिवसरात्र खेळविली जाणार आहे.ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिडारसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.