भाजपाकडून लोकसभा प्रवास अभियानान बैठकांचे आयोजन

Edited by: विनायक गावस
Published on: February 19, 2024 14:47 PM
views 68  views

सावंतावडी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने लोकसभा प्रवास अभियानाची बैठकांचे आयोजन 25 रोजी सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजप नेते महेश सारंग व भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी दिली.दरम्यान या बैठकीला भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे ,पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चित्रा वाघ हे या बैठकीला उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करून आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा घेणार येणार आहेत, असे यावेळी सौ कोरगावर यांनी सांगितले. त्या सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी कोरगावकर पुढे बोलताना म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे मिशन 400 पार हे पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व जण सज्ज झालो असून त्यासाठी आगामी निवडणुकीला भाजपकडून जो उमेदवार असेल त्याला प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी या लोकसभा प्रवास योजनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बूथ अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असून यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.