किंजवडे ग्रामपंचायतच्यावतीने 'इको फ्रेंडली' गणेश मूर्ती स्पर्धेचे आयोजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 09, 2023 11:13 AM
views 153  views

देवगड : किंजवडे ग्रामपंचायतच्यावतीने या वर्षी “इको फ्रेंडली” गणपती बाप्पांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमांकाला ३ हजार, द्वितीय २ हजार तर तृतीय १ हजार बक्षीस देण्यात येणार आहे.

यामध्ये मूर्ती ही शाडू माती, शेत माती किंवा चिकन माती पासून बनलेली असावी. मूर्ती रंगवताना केवळ नैसर्गिक रंग वापरण्यात यावेत, तसेच मूर्ती ही केवळ सहभागी स्पर्धकाने तयार करणे अनिवार्य आहे. मूर्ती तयार करतानाचा व्हिडिओ, फोटो स्पर्धकांनी २५ सप्टेंबर पर्यंत या ८०८०४७४७८५ नंबरवर पाठवणे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सहभागी स्पर्धकांनी संपर्क साधावा किंवा ग्रामपंचायत किंजवडे कार्यालयास भेट द्यावी.