दोडामार्गात सांस्कृतिक लोककला महोत्सवाचं आयोजन..!

Edited by: संदीप देसाई
Published on: January 29, 2024 13:11 PM
views 63  views

दोडामार्ग : सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्गच्या वतीने तालुक्यातील कलाकारांचा मेळावा व तालुकास्तरीय निमंत्रित लोककला महोत्सव सोहळ्याचे शनिवार दि. ३ व रविवार दि. ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजन श्री. खंडोबा सभागृह सरगवे पुनर्वसन कार्यस्थळावर आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सुमारे ५०० कलाकार सहभागी होणार आहेत. महोत्सवाचा उदघाट्न सोहळा शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोककला मंच दोडामार्ग अध्यक्ष श्री. शंकर मधुकर जाधव यांनी दिली आहे.

तालुकास्तरीय लोककलाकारांचा मेळावा व  लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील लोककलाकारांना विविध कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत लोककलेचे संवर्धन व्हावे याकरता सिंधुदुर्ग सांस्कृतिक लोक कला मंच दोडामार्ग च्या वतीने लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी श्री. देव खंडोबा सभागृह सरगवे पुनर्वसन याठीकाणी संपन्न होणार असून वेशभूषा रंगभूषा यासाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आला आहे. कलाकार, मान्यवर तसेच महिला व पुरुष प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.महोत्सवाचा उदघाट्न सोहळा शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.