नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये 'आर्ट ऑफ वंडरलॅड 'कार्यशाळेचं आयोजन

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 03, 2023 10:43 AM
views 157  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे मध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित व्हाव्या तसेच त्यांना विविध कला गुण आत्मसात करता यावेत यासाठी 'आर्ट ऑफ वंडरलॅड ' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कथाकथन, चित्रकला, विविध बौद्धिक खेळ, संगीत हे उपक्रम घेण्यात आले.हे उपक्रम सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते.विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही या कार्यशाळेला उस्फूर्त प्रतिसाद दिला.यामुळे आपल्या पाल्यामध्ये विकसित असलेल्या गुणांविषयी त्यांना अधिक जाणून घेता आले.या कार्यशाळेचे नियोजन शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. ही कार्यशाळा शाळेच्या सीईओ नीता शुक्ला व मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यामध्ये कथाकथन या उपक्रमात केजी शिक्षिका भक्ती पाटील, श्वेता आलते व तृप्ती साठविलकर यांनी नाट्यरूपात  कथेचे सादरीकरण केले. त्यानंतर ओंकार गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधनप्राधान्य  कथा सांगितली. चित्रकला उपक्रमाचे आयोजन कलाशिक्षक योगेश येराम यांनी केले तर बौद्धिक खेळांचे आयोजन शाळेचे क्रीडा शिक्षक सुयोग राजापकर व केजी शिक्षिका यांनी केले. संगीत या उपक्रमाचे आयोजन शाळेचे  संगीत शिक्षक हेमंत तेली व सहाय्यक शिक्षिका सोनाली पाटील यांनी केले होते. सर्वच विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेसाठी  उत्साह दाखवला. पालकांनीही या उपक्रमां विषयी उस्फुर्त अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्यात आलेले हे उपक्रम राबवले व कार्यशाळा अत्यंत स्तुत्य आहे.