
देवगड : देवगडच्या पर्यटन विकासासाठी एक नवा उपक्रम पुढं आयला आहे. नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण कातळशिल्प असे म्हणतो. कातळशिल्प जगात काही मोजक्या ठिकाणीच आढळतात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी आढळून आली आहेत. पण भारतातील कोकणात फार मोठ्या प्रमाणात ती आढळतात आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे.
8 जानेवारी 2023 रविवार सहलीची रूपरेषा : सुरुवात सकाळी 8:00 वाजता देवगड स्टॅन्डवरून. वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून पुढे त्यानंतर बापर्डे येथे वानिवडे तळेबाजार दाभोळे येथील पोखरबाव करून परत देवगडला येईल. या पूर्ण सहलीत 15 ते 18 सुबक कातळ शिल्प पाहायला मिळतील. या कातळ शिल्प सहलीचे मूल्य 450 रुपये ( प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण ) आकारण्यात आले आहे. सहलीसाठी इच्छुक सर्वांनी आपली नावे अजित टाककर यांच्याकडं नोंदवावी, असं आवाहन करण्यात आलंय.