
देवगड : रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगड आणि डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 23 रोजी सकाळी 9 ते 1 यावेळेत ही शिबिर आयोजित केले आहे. तरी गरजूनी यां शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड तर्फे करण्यात येत आहे. या शिबिरात संगणकाद्वारे अचूक चष्मा नंबर व मोतीबिंदू निदान, मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात, सवलतीच्या दरात चष्मे वाटप केले जाईल. सदर शिबीर हे डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय, सातपायरी, देवगड येथे घेण्यात येईल.अधिक माहितीसाठी रो. दयानंद पाटील यांच्याशी संपर्क साधावा.