१५ जानेवारीला मुणगेत रक्तदान शिबीराचं आयोजन

Edited by:
Published on: January 13, 2025 19:56 PM
views 114  views

देवगड : श्री देवी भगवती देवस्थान मुणगे आणि डॉ.सुजित एकनाथ कदम यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,शाखा देवगड यांच्या सौजन्याने मुणगे येथील श्री भगवती देवालय नजिक १५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १.०० या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी पुढील नंबरवर संपर्क साधावा. ओंकार पाध्ये अध्यक्ष, श्री देवी भगवती देवस्थान मुणगे (९५२९३२७५७५), डॉ. सुजित कदम, दत्त कृपा क्लिनिक मुणगे (९४०५२७४९३६), देवदत्त पुजारे व्यवस्थापक, भगवती हायस्कूल मुणगे (९४२११४६१६६).