‘आविष्कार’ संशोधनात्मक परिषदेचं आयोजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 08, 2023 12:49 PM
views 136  views

देवगड : ‘आविष्कार’ या संशोधनात्मक परिषदेच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला चालना देऊन त्यांना योग्य व्यासपीठ निर्माण करून देणे या उद्देशाने अविष्कार या संशोधनात्मक परिषदेचे आयोजन मुंबई विद्यापीठाकडून करण्यात येते. 

या परिषदेत विद्यार्थी विविध विषयावर आपला संशोधनात्मक अहवाल सादर करतात.यावर्षी आयोजित १८ व्या आविष्कार संशोधन परिषद- २०२३-२४ मध्ये कणकवली महाविद्यालयात संपन्न झालेल्या विभागीय फेरीत देवगड महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील दोन संशोधनात्मक अहवाल विद्यापीठ स्तरावर अंतिम फेरीसाठी निवडले गेले. १) ‘Changes in Mangrove – People’ Point of View and Economic Activities’ सहभागी विद्यार्थिनी- नुपूर मकरंद लळीत ( FYBSc) व २) ‘समुद्र कासव संवर्धन उपक्रम- समस्या आणि संभाव्यता’ सहभागी विद्यार्थी – तनुजा सीताराम तानवडे, वैष्णवी विलास बोरकर, सेजल सदानंद परब, मनोहर शंकर माणगावकर ( TYBA Geography) या दोन्ही प्रकल्पांचे मार्गदर्शक प्राध्यापक भूगोल विभागातील प्रा. गुरुप्रसाद घाडी असून वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा. नागेश दप्तरदार यांचे ही सहकार्य लाभले. याचबरोबर गेल्या वर्षी २०२२-२३ मुंबई विद्यापीठ १७ व्या आविष्कार अंतिम फेरीत तृतीय पदक प्राप्त प्रकल्प ‘ देवगड तालुक्यातील मासेमारी – समस्या आणि संभाव्यता ‘ या प्रकल्पाचे मुंबई विद्यापीठाच्या संघाकडून राज्य स्तरावर सादरीकरण करणाऱ्या तनुजा तानवडे हिला मुंबई विद्यापीठ येथे विद्यापीठाच्या माननीय कुलगुरूंच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. सदर प्रकल्प ही भूगोल विभागाचा असून त्यालाही प्रा. गुरुप्रसाद घाडी यांचे मार्गदर्शन लाभले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे शिक्षण विकास मंडळ संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.