जिल्ह्यात २९ सप्टेंबरपर्यंत आँरेंज अलर्ट तर ३० सप्टेंबर व १ ऑक्टोंबर रोजी यलो अलर्ट..!

Edited by:
Published on: September 28, 2023 17:26 PM
views 205  views

सिंधुदुर्गनगरी : मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या  माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. 28 व 29 सप्टेंबर 2023 रोजी ऑरेंज अलर्ट तर दि. 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच दि. 28 व 29 सप्टेंबर तसेच 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून विजा चमकण्याची तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती  व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.