
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात २१ ते २५ जून २०२४ या कालावधीत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तसेच २२ जून २०२४ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ५० ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार असून या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.